Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

खळबळजनकघटना ..!दोन तरुणांची चाकूने भोसकून व दगडाने ठेचून हत्या केल्याची

बुलडाण्यातील खामगावात दुहेरी हत्याकांड

खामगाव// बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दोन तरुणांची चाकूने भोसकून व दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनकघटना घडली. ही घटना आज रात्री दोन वाजता घाटपुरी नाका येथे घडली. विशाल देशमुख (32) व सचिन पवार (33) अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत. अवैध सावकारी आणि युवकांच्या दोन गटातील वादातून हे दुहेरी हत्याकांड झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.घटनेची
माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आधिक तपास पोलिस करीत आहेत .
घाटपुरी नाका भागात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोघे तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

त्यानंतर शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. मात्र, त्यांचा अगोदरच मृत्यु झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट दिली असून संशयावरुन एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.