Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर

30 डिसेंबरला सभापतींची तर 4 जानेवारीला अध्यक्षांची निवड

बीड// प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर बीड जिल्हयातील 11 पंचायत समित्यांसह बीड जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.त्यानुसार पंचायत समिती सभापती उपसभापतीपदाची निवड 30डिसेंबरला तर जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड 4 जानेवारिला होत आहे.

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यां निवडीला राज्य शासनाने 120 दिवसांची मुदत वाढ दिली होती. ती मुदत 20 डिसेंबर रोजी संपली.मात्र मागील पंधरवाडयापासुन राजकीय वर्तुळाचे लक्ष पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमाकडे लागले होते.आता जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हा कार्यक्रम जाहिर केला आहे.
जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी 30 डिसेंबरला विशेष बैठकीत निवडणूक होणार आहे. 

@जिल्हयातील 11 पैकी शिरुर कासार पंचायत समिती अनुसूचित जाती महिले साठी,

@अंबाजोगाई, केज, पाटोदा,वडवणी ही सभापती पदे महिला राखीव 

@गेवराई, धारुर, बीड या ठिकाणी सर्वसाधारण  सभापती असणार आहेत.

@बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखिव असुन या पदासाठी 4 जानेवारिला मतदान होणार आहे.