Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड पोलीसांची 24 तास सोशल मीडियावर करडी नजर;सीसीटीव्ही फुटेज चेकींग सुरू


बीड//  येथे  कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आजपासून बीड जिल्ह्यात१४४ कलमान्वये जमावबंदी आदेशलागू करण्यात आल्याचे सांगत जोपर्यंत जमावबंदी आदेश लागूआहे तोपर्यंत ना समर्थनार्थ नाविरोधात कुठल्याही मोर्चालापरवानगी देणार नाही, असे म्हणत जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोदार यांनी काल दगडफेक केलेल्यातथाकथीत नतद्रष्टांच्या मुसक्याबांधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेकींग सुरू आहे.लवकरच त्यांना ताब्यात घेणार आहोत.

बीड पोलीस 24 तास सोशल मीडियावर करडी नजर ठेवून आहेत. काल चौकात समाजकंठकांनी दगडफेक केली होती त्यामध्ये विविध अफवामुळे आज सकाळी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तपासला व पुतळ्याचे स्पष्ट छायाचित्रे घेण्यात आलेली आहेत. पुतळ्याची कोणत्याही प्रकारची विटंबना झालेली नाही. कोणीही अफवा सोशल मीडिया व इतर माध्यमातून पसरवू नयेत.अफवा पसरवणाऱ्यावर कलम 505(2)IPC प्रमाणे कारवाई करण्यात येईल.अशी माहिती  बीड पोलीसांनी दिली आहे .