परळीतील महाराष्ट्र बॅंकेचे एटीएमला आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक शाॅटसर्किट झाल्याने आग लागली.त्यात एटीएम मशीन जळून खाक झाले.ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. नगरपालिकेचा अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन बंब जर वेळेवर उपलब्ध झाला नसता तर परिसरात आग पसरून मोठा अनर्थ घडला असता. नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने वेळोवेळी अग्निसुरक्षा आॅडिट करून घ्यावे असे आवाहन व्यापारी व दुकानदारांना केले. पण, कोणीही याची दखल घेत नाही म्हणून ही घटना घडली


Social Plugin