श्रीअन्नपूर्णादेवीची आरती परळीचे तहसीलदार डॉ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
परळी // जेव्हा पृथ्वीवरील लोकांना खाण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा आई पार्वतीने अन्नपूर्णाचे रूप धारण करून पृथ्वीला या संकटातून बाहेर काढले.याच धरतीवर परळीत श्रीअन्नपूर्णादेवीच्या प्रकट दिनानिमित्त देवीची आकर्षक धान्यश्रंगार पुजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. श्रीअन्नपूर्णा चॉरिटेबलट्रस्ट द्वारा संचालित अन्नछत्र येथे देवीची पूजन व आरती परळीचे तहसीलदार डॉ.बिपीन पाटील व नायब तहसीलदार सदानंद बरदाळे यांच्या हस्ते करण्यात आली.
परळीत श्रीअन्नपूर्णा चॉरिटेबलट्रस्ट द्वारा संचालित अन्नछत्र अन्नपूर्णा प्रकटदिन मानवी जीवनात अन्नाचे महत्त्व दर्शवितो.धान्य योग्य प्रकारे वापरणे फार महत्वाचे आहे.म्हणून, अन्नाचा योग्य वापर केला पाहिजे.अश्या संदेशाचे यादिवशी परळी तालुक्यात food for life.. Save foodअश्या संदेशाचे 21000 हजार कार्डचे वाटपही करण्यात आले.
@अन्न हे परब्रम्ह' हे फक्त म्हणुन चालणार नाही तर आचरणात आणावे अन्न उष्टे टाकु नये.
@अन्नाची गरज सर्वांनाच आहे. अन्न टाकून देऊन एखादयाच्या तोंडचा घास काढू नका.
@भारतात २३ कोटी लोक रोज उपाशी झोपतात. वाया जाणारे अन्न वाया न घालवता एखाद्या ची भूका भागवली तर त्या सारखे पुण्यकर्म नाही.
@भारतात रोज ३५०० व जगात दर ३.५ सेकंदाला १ असे भूकबळी
होते.असा भुकबळीचा रिपोर्ट सांगतो. ३३% अन्न उष्ट टाकल्या जातं.
@भूकबळी हा शाप आहे. अन्नदान करुन आपण तो कमी करू या.
@आपल्या परिवाराला व पाल्यांना अन्न उष्टे न टाकण्याची सवय आपणच
लावु लाऊया. लग्नकार्य व इतर समारंभात अन्नाचा अ्नादर करु नका.
यावेळी जाहीरआवाहन अध्यक्ष अनिल लाहोटी, कॉर्डिनेटर राकेश चांडक ,सचिव संजय स्वामी ,उपाध्यक्ष कचरूलाल
उपाध्याय ,सहसचिव उमेश टाले, कोषाध्यक्ष शिवराज उदगीरकर व समस्त अन्नपूर्णा परिवार सदस्य व मित्रपरिवार असा संदेश दिला.



Social Plugin