Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक ब्रेकिंग..! परळीत डोळ्यात मिरची पूड टाकून 95 हजार रुपये केले लंपास


परळी//  वैधनाथ गॅस एजन्सीच्या समोर किरकोळ व ठोक व्यापारी अग्रवाल यांचा पाठलाग करत येऊन त्यांच्या घरासमोरच अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून 95 हजार रुपये लंपास केले .आपले दुकान बंद करून राञी 9 च्या सुमारास घरी येत असताना ही घटना घडली आहे .

परळी येथील नाथ रोड येथे राहणारे प्रतिष्ठित व्यापारी अग्रवाल यांचे घर आहे. ते नेहमीप्रमाणे आपले मोंढा मार्केट मधील दुकान बंद करून दिवसभरतील व्यापार करून , पैसे घेऊन येत असताना .आपल्या शिवाजी चौक नाथरोड लगत असलेल्या घरी परतत असताना अज्ञात चोरट्याने त्यांचा पाठलाग करत . घराच्या जवळ आले असता अचानक त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील रोख रक्कम अंदाजे 95 हजार रुपये लुटल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे सदर घटनेत अग्रवाल यांच्यावर नजर ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्यांनी वर्दळीच्या रस्त्यावर सुद्धा आपला डाव साधला आहे. या घटनेने भयभीत झालेले परिसरातील नागरिक यांची तारांबळ उडाली अधिक तपास परळी पोलीस करीत आहे.

.सविस्तर बातमी थोड्यावेळात