Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ईडी म्हणजे नेमकं काय?कशी आहे ईडीची कार्यपद्धती ...अनेक प्रश्न तुमच्याही मनात असू शकतात तर मग वाचाही संपूर्ण बातमी ...




मुंबई // तुम्हाला माहिती आहे का ईडी म्हणजे नेमकं काय? ही संस्था कशी काम करते? कोणकोणत्या घोटाळ्यांची ईडीने चौकशी केली आहे ? याचा रेकॉर्ड कसा आहे ? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असू शकतात. अंमलबजावणी संचलनालय म्हणजे ED(ईडी- संक्तवसुली संचलनालय) हे नाव आपण गेल्या अनेक दिवसांपासून ऐकत आहोत. ईडीने गुन्हा दाखल केला. ईडीने कारवाई केले असे अनेक शब्द आपल्या कानांवर पडत आहेत. आज आपण याबद्दल जाणून घेऊयात.

1 मे 1956 रोजी परकीय नियमन चलन कायदा 1947 अंतर्गत ईडीची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला या विभागाचे नाव सक्तवसुली विभाग असे होते. परंतु यानंतर एका वर्षातच म्हणजे 1957 साली या विभागाचे नाव सक्तवसुली संचलनालय ठेवण्यात आले. ईडीचा प्रमुख उद्देश दोन कायद्यांशी संदर्भात आहे. पहिला कायदा म्हणजे परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999(FEMA- Foreign Exchange Management Act). दुसरा कायदा म्हणजे काळा पैसा प्रतिबंधक कायदा 2002(BMPA-Black Money Prevention Act). या दोन्ही कायद्यांअतर्गत जे गुन्हे दाखल केले जातात त्यांची चौकशी करणं हा ई़डीचा प्रमुख हेतू आहे.

कशी आहे ईडीची कार्यपद्धती ?

ईडी पोलीस यंत्रणेप्रमाणेच काम करते. मोठे आर्थिक घोटाळे जे आहेत त्या प्रकरणाची चौकशी ईडीच्या माध्यमातून केली जाते. जर ई़डीकडे तक्रार करायची असेल तर यासाठी काही अटी आहेत.
1) त्या विशिष्ठ घोटाळ्यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल असावी. असे असेल तर ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जाते.
2) थेट ईडीकडे जाऊन तक्रार करण्यासाठी तक्रारदाराकडे सबळ कागदोपत्री पुरावे असायला हवेत.

कुठे-कुठे आहेत ईडीची कार्यालये ?
ईडीचं प्रमुख कार्यालय दिल्लीत आहे. याशिवाय इतर पाच राज्यांमध्ये ई़डीची कार्यालये आहेत. यात मुंबई, चेन्नई, चंदीगड, कोलकाता, दिल्ली याठिकाणी उपविभागीय कार्यालये आहेत. देशभरातील 13 शहरांमध्ये ईडीची क्षेत्रीय कार्यालये आहेत. यात अहमदनर, बँगलोर, चंदीगड, चेन्नई, कोची, पंजाब, गुहाटी, हैद्राबाद, जयपूर, जालंधर, कोलकाता, पटना, श्रीनगर या शहरांचा समावेश होतो. याशिवाय इतर 11 शहरांमध्ये ईडीची उपक्षेत्रीय कार्यालये आहेत. यात भुवनेश्वर, कोझीकोडे, इंदूर, मदुराई, नागपूर, आमदाबाद, रायपूर, डेहराडून, रांची, सुरत, शिमला यांचा समावेश आहे.

येथील ठिकाणच्या प्रमुखपदी उपसंचालक असतात. मुंबईमधील ईडीचे कार्यालय बलाड ईस्टेट येथे आहे. आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सामान्य नागरिकांना चौकशी करायची असेल तर ते थेट ई़़डीच्या कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करू शकतात. यासाठी त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावे असायला हवेत.

ईडीची विशेष न्यायालये कसे काम करतात ?
ईडीची स्वतंत्र न्यायालये असतात. काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 4 अंतर्गत केंद्र सरकार आणि संबंधित राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून ही न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. BMPAया नावाने ही न्यायालये ओळखली जातात. या न्यायालयांमध्ये जो निकाल दिला जातो त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार याचिकाकर्ते तसेच समोरच्या पार्टीलाही असतो.

कोणत्या प्रमुख घोटाळ्यांची ईडीने चौकशी केली आहे ?
नॅशनल हेराल्ड घोटाळा, आयडीबीआय घोटाळा, 2 जी घोटाळा, शारदा चीटफंड घोटाळा, कोळसा घोटाळा, आदर्श घोटाळा, रॉबर्ट वाड्रा जमीन प्रकरण, रोजा व्हॅली केस, कोहिनूर स्क्वेअर घोळाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची ई़डीने चौकशी केली आहे. याशिवाय ईडीने हाफिज सईदची गुरुग्राममधील मालमत्ता तसेच दाऊद इब्राहिमची संपत्ती जप्त केली आहे.