Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

छटकभर पावसामुळे चक्क! शिवाजी नगर ठाण्यातच पाणी घुसले.; तुंबलेल्या नाल्या गटारे यांच्यामुळे ही अवस्था..



बीड // चक्क शिवाजी नगर ठाण्यातच पाणी घुसले. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बीड शहर पाणीमय झाले. सदरील  आपत्कालीन परिस्थिती  निर्माण करणाऱ्या  नगरपालिका प्रशासन वर  पोलीस  काय कारवाई करतात याकडे  जनसामान्य  लक्ष्य लागले आहे .

शहर आणि परिसरात प्रथमच सोमवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन तास झालेल्या पावसाने शहरात सर्वत्र पाणी झाले. नाल्या तुंबल्याने रस्त्यावर पाणी येऊन रस्त्याला नदीचे स्वरूप आले.
दरम्यान, जोरदार पाण्याचा लोंढा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घुसल्याने ठाणेही जलमय झाले. पाणी विद्यात उपकरनंजवळ गेल्याने वीज पुरवठा खंडित करावा लागला. ठाण्यातील साहित्याची आवरा आवर करताना पोलिस कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले.