Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रस्ता शोधतो आहे खड्डेतून वाट..! डोंगरतुकाई रस्ता दुरुस्त करण्याची भाविकांची मागणी.... 80 कोटीच्या रस्त्याचे तीन तेरा वाजले.


परळी // नवरात्रोमहोत्सवाच्या निमित्ताने डोंगरतुकाई येथे असणार्‍या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या रस्त्यावरुन पायी तसेच वाहनाद्वारे भाविक मंदिराकडे जातात  परंतु या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. जागो जागी मोठमोठे पडलेले खड्डे पावसामुळे निर्माण झालेला चिखल याचा सामाना भाविकांना करावा लागणार आहे. 

29 सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार आहे. 9 दिवस चालणार्‍या नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
दरम्यान घटस्थापना सुरु होण्यापुर्वीच या रस्त्याची दुुरस्ती करावी अशी मागणी भाविकातुन होत आहे.
येत्या काही दिवसावर नवरात्रो महोत्सव आला असुन परळी शहरातील व परिसरातील भक्त भाविक मोठ्या प्रमाणावर डोंगरतुकाई देवीच्या  दर्शनासाठी जातात. या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असुन घटस्थापनेपुर्वी दुरुस्त करुण द्यावा अशी मागणी भाविकातुन होत आहे. तर सार्वजनिक बांधकाम उपविभागाशी संपर्क साधला असता परळी-चांदापुर-घाटनांदुर रस्त्याचे काम तीन वर्षापासुन प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. सध्या हा रस्ता हायब्रिड अन्युईटी या योजनेअंतर्गत मंजुर झाला असुन याची लवकर सुरु होणार असल्याचे उपअभियंता एस.बी.काकड यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,  परळी-चांदापुर-घाटनांदुर-फावडेवाडी पर्यंत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रिड अन्युईटी या योजनेअंतर्गत मान्यता मिळाली असुन लवकरच त्याचे काम सुरु होणार असुन यावर 80 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे कळते.