गोंदीया // शासनाच्या हलगर्जीपणाने आणखी एक निष्पाप बळी घेतला आहे. तब्बल १५ वर्षे प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम करूनही पगार न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील एक शिक्षक केशव गोबाडे यांनी 15 ऑगस्ट रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. गरिबी, नैराश्य व सहनशीलता संपल्यानेच गोबाडेंनी आपली जीवनयात्रा संपवली आहे याच धरतीवर आजही अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हाल होत असून तेही इच्छा मरणाच्या मार्ग आहेत.
गोबाडे हे आदिवासी ज्युनियर कॉलेज, झाशीनगर, मोरगाव अर्जुनी येथे विनावेतन कार्यरत होते. शासनाची वेतन अनुदान दिरंगाई व हलगर्जीपणामुळे ते नैराश्येत होते. वेतन नसल्याने मागील ६ वर्षांपासून त्यांची पत्नी मुलासह त्यांना सोडून गेली होती.
लहानपणीच आईचे निधन झालेले होते. फक्त वडील होते आणि त्यात १ रुपया वेतन नाही. अनुदान येईल या आशेवर ते जगत होते. पण आचारसंहिता जवळ येऊन ठेपलेली असतानाही शासन निर्णय निघत नव्हता. या सर्व तणावाखाली त्यांनी गुरुवारी विष प्राशन करून स्वत:ला संपवले. त्यांच्या आत्महत्येनंतर गोंदिया जिल्ह्यातील विनाअनुदानित शिक्षकां मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Social Plugin