औरंगाबाद// औरंगाबाद येथील झाल्टा फाटा येथे सकाळी स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन करण्यासाठी शाळेकडे निघालेल्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारनं उडवले . ही घटना येवढ्या वेगात घडली की, विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला . या दुर्देवी घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली होती .
संभाजी ज्ञानेश्वर शिंदे (९) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. झेंडावंदनासाठी तो शाळकडे निघाला असताना भरधाव कारनं संभाजी शिंदेला चिरडलं. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका करणार होता. मात्र, संभाजीचा अपघाती मृत्यू झाला. अपघातात संभाजीचा मृत्यू झाल्याचे पाहून कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. घटनास्थळी संतप्त नागरिकांनी मोठा आक्रोश व्यक्त् केला. त्यामुळे झाल्टा फाटा ते केंब्रिज रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरम्यान, सर्व वाहतूक बीड बाह्यवळ रस्त्यवरून वळवण्यात आली आहे.
संभाजीच्या अपघाती निधनामुळे शिंदे कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिस कारचालकाचा शोध घेत आहेत.
Social Plugin