Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! अंबाजोगाई पोलिसांना यश; घरफोडी करणारी टोळीस केले जेरबंद..




अंबाजोगाई // शहरातील छत्रपती चौका नजीक असलेल्या नंदलाल नगर मधील रहिवासी विजय देशमुख हे संपूर्ण परिवारासह त्यांचे वडील आजारी असल्याने  त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सोलापूरला गेल्याची संधी साधून 4 व 5 जुलै च्या मध्यरात्री चोरट्याने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करत
घरात ठेवलेल्या सोन्याच्या 5 अंगठ्या चांदीचे भांडे,मोबाईल नगदी रक्कम असा एकूण 1 लाख 22 हजार 500 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.याप्रकरणी
 घरफोडी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात अंबाजोगाई पोलिसांना यश आले असुन सर्व आरोपीला 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान या चोरी प्रकरणी गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचारी पो.हे.कॉ.नागरगोजे,कांबळे,एलमाटे,वाव्हळे यांनी अजय सतीश वाघमारे (वय19) रा.रमाई चौक,सूरज महादेव काळुंके(वय21) रा. कबीर नगर व रोहिदास उर्फ रोहित त्रिम्बक मस्के या अल्पवयीन आरोपीस जेरबंद केले असुन सर्वाना 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.