Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत अवतरली पंढरी;संस्कारच्या पालखी सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या दिंडीने साक्षात घडविली वारी


परळी// विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच महाराष्ट्रातील संतांचे कार्य आपला सर्वांच्या जीवनाचा एक भाग असणारी पंढरीची वारी अनुभवता यावी, या वारीचे महत्व समजावे या उदेशाने दरवर्षीच शालेय स्तरावर ज्ञानदेवाची पालखीसह दिंडी पालखीचे आयोजन केले जाते.
पंढरपुरच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने हजारो वारकरी कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास अंगावर ऊन, पाऊस घेवून करून पोहचतात. याची अनुभूती घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कार प्राथमिक शाळेने आषाढी एकादशी निमित्त भव्यदिव्य अशा पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्ञानदेवाच्या पालखीचे पुजन पद्मावती शिक्षण
संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण जगाला विश्वशांतीचा संदेश दिला तसेच महाराष्ट्र ही संतांची भूमी या भूमीत अनेक महान संतांनी आपल्या भक्तीमार्गाच्या कार्यातुन सर्वधर्म समभाव रूजविण्यासाठी लहान मोठेपणा, गरीब श्रीमंतांची दरी दुर करण्यासाठी समतेची बीजे या पावन भूमीत पेरली. वारी म्हणजे भक्ती, शिस्त, शक्ती यांचा ञिवेणी संगम आहे.
वारी हा एक आनंद सोहळा असतो. वारी हा आनंद, चैतन्य निर्माण करणारा वारकऱ्यांचा उत्सव हा आनंद विद्यार्थ्यांनाही मिळावा. संस्कार प्राथमिक शाळेने आयोजन केलेल्या दिंडीमध्ये बैलजोडी सजवलेली ज्ञानदेवांची पालखी, भगवे झेंडेधारी छोटे छोटे वारकरी, टाळकरी, डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेवून वारीत सहभागी झालेल्या लहान लहान मुली, अश्वधारी पथक, विणेकरी, विविध संतांच्या वेशभुषा केलेली विद्यार्थी, वासुदेव, ग्यानबा तुकारामाच्या गजरात वारीत सहभागी झालेली छोटे माऊली यांनी दंग झाले. माझ्या विठ्ठल माझी वारी, काया ही पंढरी आत्या हा विठ्ठल यात हे वारकरी पाऊले चालत वारीत सहभागी झाले होते या छोट्या छोट्या वारकऱ्यांनी परळीत हा पंढरी दुमदुमली या पालखीने परळीकऱ्यांची मने जिंकली या पालखी परळी शहर पोलीस दलाने रहदारी सुरळीत करून सहकार्य केले. पालखी मार्ग संस्कार शाळेतून राणी लक्ष्मीबाई टावर, मोंढा मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक, रोडे चौक, हनुमान मंदिर पद्मावती गल्ली या मार्गाने मार्गस्त चाली. या पालखीचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पालखीत विद्यार्थ्यांना गजर माऊलीचा या गीतावर सुंदर असे नृत्य करून परळीकरांची मने जिंकली.
ही ज्ञानदेवाची पालखी दिंडी यशस्वी करण्यासाठी लखन परळीकर   यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्कार शाळेचे सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी  संस्थेचे अध्यक्ष डिगांबर धुमाळ, कोषाध्यक्ष शंकरराव पेंटेवार, सचिव दिपक तांदळे, अरूण तांदळे, अभिनव शाळेचे सचिव साहेबराव फड, संस्कार शाळेच्या मुध्यापिका तथा परळी भुषण पुरस्कार प्राप्त श्रीमती गित्ते पी.आर, लखन परळीकर ,प्रदीप चाटे, आदि प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.