Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! प्रभु वैद्यनाथच्या पिंडी वरील चांदीचे आवरण काढले....!



परळी//गेल्या अनेक वर्षापासून परळी वैद्यनाथ येथील शिवलिंगा वर बसवण्यात आलेले आवरण काढून अनादी काळापासून चालत आलेली प्रभू वैद्यनाथ शिवलिंगाची स्पर्श दर्शनाची परंपरा पुर्ववत सुरु करण्याची मागणी हजारो शिवभक्तांची होती. अखेर आज पासून देवल कमिटी ने पुर्ण वेळ आवरण काढून स्पर्श दर्शन सुरु केले आहे. तालुक्यातील  पाणीटंचाई व दुष्काळ  आणि  ,भक्तांच्या आग्रहामुळे देवल कमिटीनेप्रभु वैद्यनाथच्या पिंडी वरील चांदीचे आवरण काढले....! या

परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते याचधरतीवर हा सकारत्मक  निर्णय घेण्यात आला आहे

श्रुंगेरी पिठाचे शंकाराचार्य विद्या शेखरजी यांना विशेषबाब म्हणुन चांदीचे अवरण काढुन अभिषेक करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली होती.त्यावेळीच योग्य वेळ आली की हे चांदीचे आवरण काढु असे सांगण्यात आले होते .
या सगळ्याबाबी लक्षात घेऊन देऊळ कमिटीचे सचिव राजेश देशमुख व ट्रस्टी यांनी एक बैठक घेऊन हा सकारत्मक निर्णय घेतला आहे .

_❝मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता❞
_❝घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा.❞_
         *❝ हार हार महादेव  ❞