Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ब्राह्मण समाजाच्या सभागृहासाठी २५ लक्ष रुपयांचा आमदार निधी दिला पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी..



सभागृहासाठी भरीव निधी देण्याचा शब्द केला पूर्ण; समस्त ब्रह्मवृदांनी मानले आभार

परळी // शहरातील सकल ब्रह्मवृंदांच्या वास्तुसाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई  ना.पंकजाताई मुंडे यांनी आमदार निधीतून २५ लक्ष रुपयांचा भरीव निधी दिला आहे. या निधीचे पत्र स्वतः मंत्रीमहोदयांनी परळी शहरातल्या ब्रह्मवृंदांच्या हाती सुपूर्द केले.या भव्य-दिव्य इमारतीचे काम दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या हस्ते उदघाटन झाले होते,त्यांनी त्यावेळी या मंदिरासाठी ५ लक्ष रुपयांचा निधी दिलेला होता.

  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी शहरात देशपांडे गल्लीत असलेल्या श्री विठ्ठल मंदिर आणि स्व.मनोहरपंत बडवे सभागृहाचे बांधकाम गेल्या काही काळापासून सुरू होते.या इमारतीसाठी भरीव निधी देण्याचा शब्द ना.पंकजाताई मुंडे यांनी दिलेला होता, याचीच वचनपूर्ती करत २५ लक्ष रूपयांच्या आमदार  निधीचे पत्र समाजबांधवाना देण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख,भाजपा शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,डॉ.विवेक दंडे,डॉ.गुरुप्रसाद देशपांडे,दत्ताभाऊ कुलकर्णी,प्रकाश जोशी,नितीन राजूरकर,प्रसाद भातलवंडे,किरण धोंड यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  या वास्तूचे काम प्रगतीपथावर असून  यामध्ये आकर्षक मंदिर,सुसज्ज अटैच बाथरूमसह खोल्या,फंक्शन हॉल,डायनिंग हॉल, कार्यालय, स्टोअर रुम,शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय  असणारी वास्तू तयार होणार आहे.या ठिकाणी लग्नसोहळा, व्रतबंध सोहळा, यासह अनेक कार्यक्रमांसाठी विठ्ठल मंदिर सभागृहात करता येतील.सकल ब्राह्मण समाजाची ही मोठी भव्य दिव्य इमारत साकारली जात असून या इमारतीसाठी ना.पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या भरीव निधीमुळे लवकरच ही इमारत पूर्णत्वास जाणार आहे, त्याबद्दल समस्त ब्रह्मवृदांनी त्यांचे आभार मानले आहेत.
••••