Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking सावधान ! रेल्वेत फेरीवाल्यानंकडून अन्नपदार्थ फळे असो यापाणी विकत घेताय तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला रेल्वेतील पाणीसुद्धा प्यावं वाटणार नाही!


प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


रेल्वेने प्रवास करंताना तहान लागल्यावर तुम्ही  सहज मिनरल वॉटर असलेली पाण्याची बॉटल विकत घेता आणि त्यातील पाणी पिता. तर सावधान कारण ही बंद पाण्याची बॉटल तुमच्या आरोग्याला हानीकारक ठरु शकते. कारण नुकतंच बाटलीबंद पाण्याचा एकव्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मिनरल वॉटर म्हणून विकत घेतलेली बॉटल ही रेल्वे स्थानकावरील साध्या नळाचे पाणी भरुन दिलेली असू शकते. धक्का बसला ना, पण हे खरं आहे.

या व्हिडीओत एक मुलगा स्टेशनवरील नळाचे पाणी बाटल्यांमध्ये भरत आहे. त्यानंतर त्या व्यवस्थित सीलबंदही करताना दिसत आहे. कदाचित तो या पाण्याच्या बॉटल या मिनरल वॉटर बॉटल म्हणून विकत असल्याची शक्यताही अनेकांनी व्यक्त केली आहे.  मात्र यामुळे प्रवाशांची फसवणूक होत असल्याचेही यानिमित्ताने समोर येत आहे.

दरम्यान हा व्हिडीओ कोणत्या रेल्वे स्थानकावरील आहे, याची मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.