Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल! २७ कोटी रुपयांचे ५८ किलो सोने चोरीला... वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानात चोरी



औरंगाबाद // सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल २७ कोटी रुपयांचे ५८ किलो सोने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वामन हरी पेठे या सुवर्ण पेढीच्या मॅनेजर आणि तीन कर्मचाऱ्यांनीच हे सोने पळवले असून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐवढे सोने चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
औरंगाबादच्या समर्थनगर परिसरातील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेतून हे सोने चोरीला गेले आहे. वर्षभरापूर्वी ही जबरी चोरी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. चोरीचा गुन्हा आज दाखल केल्यामुळे त्याचवेळी गुन्हा दाखल का करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, विश्वनाथ पेठे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी दुकानातील चोरीस गेलेला माल २० जून २०१९ पर्य़ंत आणून देतो असे सांगितले होते.
मॅनेजर अंकुर याने सहआरोपी लोकेश जैन आणि राजेंद्र जैन यांच्या मदतीने हे सोने चोरल्याचे पुढे आले आहे. व्यवस्थापकाने अन्य गुन्हा केल्याचे मान्य केले असून या चोरीप्रकरणी औरंगाबाद क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विश्वनाथ पेठे यांनी तक्रार दिली आहे.