Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking वर्ल्डकप 2019 ! Tos जिंकून करावी लागेल फलंदाजी –पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडणार..?



पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लॉर्ड्सवर सामना होणार आहे. या सामन्यात त्यांचा पराभव झाल्यास किंवा विजयाची आकडेवारी चुकल्यास थेट वर्ल्डकपमधून बाहेर पडणार आहेत. जर आजच्या  सामन्यात पाकिस्तान टॉस हारला आणि बांगलादेशने पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला तर तिथेच पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडणार. त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर सध्या एकच पर्याय आहे. '  फलंदाजी करताना पाकिस्तानला ४०० धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे. त्यानंतर बांग्लादेशच्या संघाला ८४ धावांवर ऑलआऊट करावे लागेल त्याचबरोबर जर त्यांनी ३५० धावा केल्या तर बांगलादेशला ३८ धावांवर ऑलआऊट करावे लागेल. त्यामुळे हे गणित प्रत्यक्षात शक्य नाही. त्यामुळे पाकिस्तान जवळजवळ वर्ल्डकपमधून बाहेर पडलेलाच आहे.

या संघांनी केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

स्पर्धेच्या ४१ सामन्यानंतर जवळपास सर्व चित्र स्पष्ट झाले असून ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून न्यूझीलंडचा देखील प्रवेश जवळपास निश्चित आहे. कारण पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एखाद्या चमत्काराचीच गरज आहे.