Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एका ‘क्लिक’वर कळेल रेल्वे लाईव्ह अपडेट आणि सर्व काही फक्त ..एका ‘क्लिक’वर


 दिल्ली //  ‘रेलयात्री’ या अॅपला आयआरसीटीसीने ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकींगची अधिकृत मान्यता दिल्यानंतर ‘रेलयात्री’ने आपल्या ग्राहकांना विविध फिचर दिले आहेत. रेलयात्रीने अनेक फिचर एकत्रित आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिले आहेत. जेणे करुन एकाच अॅपवर तुम्हाला विविध सुविधा उपलब्ध होतील.

एका ‘क्लिक’वर कळेल रेल्वे लाईव्ह अपडेट –

या फिचर मध्ये तुम्हाला रेल्वेची सर्व स्टेट्सची माहिती मिळेल. तुम्ही प्रवास करु इच्छित असलेले रेल्वे सध्या कोठे आहे. तीला तुम्हाला हव्या असलेल्या स्टेशन पर्यंत पोहचायला किती वेळ लागणार आहे. किंवा रेल्वेला याला किती उशीर आहे ही सर्व माहिती तुम्हाला घर बसल्या आता मिळणार आहे. यासाठी रेलयात्रीने एक पर्याय दिला आहे. ज्यात ‘where the train’ या ऑप्शन वर क्लिक केल्यास तुम्हाला रेल्वेचे लाईव्ह अपडेट मिळतील.

पीएनआर नंबर वर मिळावा तिकीट वेटींगबद्दलची माहिती –

एवढेच नाही तर तुम्ही तुमचा पीआरएन नंबरचा वापर करुन तुमची सीट, वेटिंग लिस्ट, कोच नंबर आणि चार्ट तयार होणाऱ्या सर्व सूचनांची माहिती मिळवू शकतात. याशिवाय यात वेटिंग तिकिटाच्या कन्फर्म होण्याच्या शक्यतेबाबतची माहिती देखील मिळवू शकतात. तसेच वेळोवेळी तुम्ही पीएनआर संबंधित सर्व अपडेट मिळतील.

रेल्वेत करा जेवणाची आर्डर –

या अॅपवरुन तुम्ही रेल्वे मध्ये जेवण देखील आर्डर करु शकतात. ज्या स्टेशन वर तुम्हाला जेवण हवे आहेत त्या स्टेशनवर तुम्हाला जेवण तुम्ही बसल्या असलेल्या जागेवर येऊन देण्यात येईल. जेवणासंबंधित अनेक कोम्बो पॅक देण्यात आले आहेत आणि विविध ऑफर देखील रेलयात्री अॅपवरुन देण्यात येतात.

रेल्वे टाईमटेबल पहा इंटरनेट विना –

एकदा का तुम्ही हे अॅप डाऊनलोड केले की रेल्वेची टाईमटेबल तुम्ही इंटरनेटच्या वापराशिवाय पाहू शकतात. ट्रेनवर तुमच्या सीट, कोचची माहिती लावण्या आधी तुम्हाला कोचच्या पोजिशन बरोबरच रेल्वे कोणत्या प्लॅटफार्मवर आहे हे अॅपवरच कळेल. याशिवाय प्रवासात कोणतीही मेडिकल इमरजेंसी असल्यास तुम्ही प्रवास करत असलेल्या मार्गाच्या आसपास असलेल्या रुग्णालयाची माहिती मिळवू शकतात. याच अॅपच्या आधारे तुम्ही हॉटेल देखील बुक करु शकतात. यामुळे तुमची पैसे देखील वाचतील.

ऑटोमॅटिक रिमाइंडर –

या अॅपमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक अपडेट देखील देण्यात येतात. यात रिमाइंडर सिस्टीम देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला तुमचे तिकीट एसएमएसला ‘add trip’ ऑप्शनवर पेस्ट करावे लागेल. त्यानंतर प्रवासात होणार उशीर, प्लॅटफार्म आणि संबंधित इतर माहिती वेळोवेळी मिळत राहिल.