Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंघंम कारवाई ! जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पक्षांतर करणाऱ्या ५ नगरसेवकांसह सहा जणांना ठरवलं अपात्र....





बीड //  महाराष्ट्रात भाजपचा वणवा पेटला असताना बीड जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला लगाम घालत भाजपला जोरदार दणका दिला आहे. पक्षांतर करणाऱ्या ५ नगरसेवकांसह सहा जणांना अपात्र ठरविले आहे.

शिरुरकासार नगर पंचायतीचे ५ नगरसेवक पक्षांतरबंदीच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच बीड येथील न. प. च्याजागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी १ नगरसेवक असे ६ नगरसेवक अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. गेल्या ५ वर्षात राज्यात भाजपाने आजवर अनेक पक्षांतरे घडवून आणली. पण पक्षांतरबंदी कायद्याखाली एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

शिरुर कासार नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष मीरा गाडेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या व सध्या भाजपसोबत असलेल्या ५ नगरसेवकांना पक्षांतरबंदी कायद्याचा भंग केल्यामुळे अपात्रतेची कारवाई केली आहे. त्यामुळे शिरुर नगरपंचायत समितीमधील भाजपची सत्ता अल्पमतात आली आहे.

राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या परंतु भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या समर्थक मिरा गाडेकर यांना नगराध्यक्ष करण्यासाठी कुसुम हिदास, शेख शमा अन्वर, आशा शिंदे, आश्विनी भांडेकर या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मदत केली होती. नगरसेवकांविरुद्ध पक्षांतरबदी कायद्याखाली अपात्रतेची कारवाई करावी यासाठी विश्वास नागरगोजे व इतरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली होती.