Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ! उच्च शिक्षण सह संचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले .


धुळे// उच्च शिक्षण सह संचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाला धुळयाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 50 हजार रूपयाची लाच घेताना   रंगेहाथ पकडले आहेत. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अतुल श्रीकांत सहजे (49) असे लाच घेणार्‍या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. याप्रकरणी एका कनिष्ठ लिपीकाने तक्रार दिली आहे. तक्रारदाराचे वरिष्ठ लिपीक अतुल सहजे यांच्याकडे काम होते. त्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. दि. 14 मे रोजी सहजे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळयाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये अतुल सहजे हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले.

त्यानंतर आज पोलिस उपाधिक्षक सुनिल कुराडे, पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या पथकाने दुपारी सापळा रचुन सहजे यांना 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे