Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात ! भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 हून अधिक जण जखमी


  कर्नाटकातील // र्चिंतामणी येथे झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात अ‍ॅटो रिक्षा आणि बसमध्ये झाला असून रिक्षामधील जवळपास सर्वच जण मृत्यूमुखी पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
बस आणि अ‍ॅटो रिक्षा हे दोन्ही वाहनांचा वेग प्रचंड असल्याने अ‍ॅटो रिक्षाचा चुराडा झाला आहे. जखमी झालेल्या 20 पैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी धाव घेतली आहे. मदत कार्य युध्दपातळीवर सुरू आहे. दरम्यान, जखमी झालेल्या सर्वांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार चालु आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 12 जण ठार झाले असून मयतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.