Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक ! पुन्हा अपघात , भिंत कोसळल्यानं 21 जणांचा मृत्यू ...


मुंबई मध्यरात्री पासून पावसाचा जोर कायम आहे. मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात भिंत कोसळल्यानं 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पावसामुळे शाळा-कॉलेज आणि आफिसेसला सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळून या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यु झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड इन्स्टिट्युटच्या कॅम्पसची सीमा भिंत कोसळून त्यात ६ कामगारांचा मृत्यु झाला असून ३ जण जखमी आहेत. तसेच कल्याण येथील उर्दू शाळेची भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली. त्यात १२ जणांचा मृत्यु झाला आहे. तर १३ जण जखमी असून त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान दाखल झाले असून बचाव कार्य सुरु झाले आहे. जखमींना जोगेश्वरी आणि कांदिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कामगारांच्या पत्र्यांच्या घरावर कोसळून झालेल्या अपघातात ६ कामगारांचा मृत्यु झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ३ कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
राधेलाल पटेल (वय २५), जेटूलाल पटेल (वय ५०), ममता राधेलाल पटेल (वय २२), जितू चंदन रवते (वय २४), ममता पटेल (वय २४) अशी मृत पावलेल्या कामगारांची नावे असून ते सर्व छत्तीसगड येथील राहणारे आहेत.

याबाबत अग्निशामक दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ही सीमाभिंत आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत नवी बांधकाम सुरु आहे. भिंतीच्या कडेला या बांधकामावरील मजूरांसाठी पत्र्याच्या शेड बांधण्यात आल्या होत्या. त्यात हे मजूर रहात होते.