Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

WhatsApp ! अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी अवश्य करा !



 दिल्ली // .व्हॉट्सअॅप अकाऊंट वरून दुसऱ्यांना चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता असते. अशा वेळी आपलं व्हॉट्सअॅप अकाऊंट कसं सेफ ठेवायचं याविषयी या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. सहज, जलद आणि चटपटीत संवादांचे सर्वात प्रभावी माध्यम बनलेल्या व्हॉट्सअॅपचा गैरवापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यासाठी.

@मेसेजची सत्त्यता तपासा-
व्हॉट्सअॅपवरील फॉरवर्डेड मेसेजवर पटकन विश्वास ठेवू नका. अशा मेसेजची सत्त्यता तपासा आणि त्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. हॅकर्स युजर्सना नेहमी नकली व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी आकर्षित करत असतात.
व्हॉट्सअॅप वेब लॉग आऊट करा –
व्हॉट्सअॅप वेब कॉम्प्युटरवर चालू राहीलं तर त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवरून बाजूला व्हाल तेव्हा व्हॉट्सअॅप वेब लॉग आऊट करा.
प्रायव्हसी ऑप्शन वापर-
व्हॉट्सअॅपवरील प्रोफाईल फोटोचा अनेकदा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर सेटींगमध्ये जाऊन अकाऊंट प्रायव्हसी ऑप्शनमध्ये देण्यात आलेल्या प्रोफाईल फोटो ऑप्शनवर क्लीक करा. त्यामध्ये माय कॉन्टॅक्ट्स ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे फोनमध्ये सेव्ह असलेल्या कॉन्टॅक्टसना तुमचा प्रोफाईल फोटो दिसेल.
व्हेरिफिकेशन कोड सुरक्षित करा –
व्हॉट्सअॅप लॉग इन हे एसएमएस आणि कॉल बेस्ड व्हेरिफिकेशनवर आधारित असतं. हॅकर्स व्हॉईसमेलच्या मदतीने व्हेरिफिकेशन कोड जाणून घेतात. यापासून वाचण्यासाठी २ स्टेप व्हेरिफिकेशन महत्त्वाचं आहे. यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटींगमध्ये जाऊन अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा त्यामध्ये असलेलं २ स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा. तसेच व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक केलं जाऊ नये यासाठी बायोमॅट्रीक लॉक ऑन करा.