Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात ! परळी गंगाखेड रोडवर युवकाचा जागीच मृत्यू



परळी//अज्ञात वाहनाने मोटार सायकलस्वारास धडक दिल्याने मोटार सायकलस्वारास जागीच ठार झाल्याची घटना परळी गंगाखेड मार्गावरीवर पांडे यांच्या पेट्रोल पंपाच्या जवळ एका राञी 11वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

शिवाजी नगर परळी येथील रहिवासी असलेला अशोक व्यकंटी कदम वय 22 वर्ष राञी 11वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटार सायकलवर परळीकडे येत असताना समोरुन एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटनेची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या मयत युवकाला परळी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.