Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान ! यु-ट्युबवर आत्महत्येचा ‘Video’ पाहून १२ वर्षीय मुलींने केले ‘सुसाईड’

नागपूर  // नागपूरच्या हंसापुरी परिसरात यु-ट्यूबवर आत्महत्येचा व्हिडीओ पाहून तशीच कृती केल्याने एका अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला.
 शिखा राठोड (वय-१२) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून तिने गळफास घेतला.
शिखाला तिच्या घरच्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गळफास घेण्यापूर्वी तिने आपल्या लहान बहिणीसोबत गळफास कसा घेतात याचा व्हिडीओ यु-ट्युबवर पाहिला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शिखाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तहसील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मुलांना मोबाईल देणं योग्य आहे का ?
पालक आपल्या मुलांना घरी एकटे असतात व अडीअडचणीला इमर्जन्सी म्हणून मोबाईल घेऊन ठेवतात. पण त्यावर कंट्रोल ठेवला नाही तर ह्याचा योग्य उपयोग न होता मुले गेम्स, चाटिंग, क्लिपिंग पाहणे या सारख्या गोष्टींमध्ये स्वतःला पूर्ण झोकून देतात. नेट सर्चिंगमध्ये जशी कोणतीही चांगली माहिती क्षणात उपलब्ध असते तशी वाईट गोष्टींचीही भर असते. वयात आलेली मुले जर वाईट गोष्टींच्या आहारी गेली तर त्याचे विपरीत होतात.