Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

इंग्लंडच्या 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला 306 धावांचीच मजल मारता आली; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव झाला. पुर्ण वृतांत..वाचा

टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये स्थान पक्कं करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. भारताकडून रोहित शर्माने शतकी खेळी साकारली. मात्र ती पुरेशी ठरली नाही. इंग्लंडतर्फे लायम प्लंकेटनं 3 विकेट्स घेतल्या.

रोहित शर्मा शतक करून बाद झाला. त्या पाठोपाठ ऋषभ पंत देखील आऊट झाला. लायम प्लंकेटने हार्दिक पंड्याला आऊट केलं.

रोहितने प्लंकेटच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत यंदाच्या वर्ल्ड कपमधलं तिसरं तर करिअरमधलं 25वं शतक पूर्ण केलं.

राहुल झटपट बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी डाव सावरला. कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं. विराटच्या तुलनेत संयमी खेळ करणाऱ्या रोहितने रशीदच्या गोलंदाजीवर चौकार खेचत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र लायम प्लंकेटने कोहलीला बाद करत ही जोडी फोडली. कोहलीने 7 चौकारांसह 66 धावांची खेळी केली.

कोहली-शर्मा जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली.

मोहम्मद शमीने जो रूटला बाद करत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. त्यानं 44 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने बेन स्टोक्सनं अर्धशतकाची नोंद केली. इंग्लंडने तीनशे धावा पूर्ण केल्या. मोहम्मद शमीने जोस बटलरला बाद केलं. त्याने 8 चेंडूत 20 धावा केल्या. शमीने 5 विकेट्स घेतल्या.

वर्ल्ज कपमध्ये सलग तीन मॅचमध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा शमी केवळ दुसरा बॉलर आहे. याआधी शाहिद आफ्रिदीने हा विक्रम केला होता. शमीने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 4 विकेट्स घेतल्या तर या मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या.

Image copyrightGETTY IMAGESप्रतिमा मथळामोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतल्या

वर्ल्ड कपमध्ये एका डावात पाच विकेट्स घेणारा शमी सहावा भारतीय बॉलर आहे. याआधी कपिल देव, रॉबिन सिंग, वेंकटेश प्रसाद, आशिष नेहरा, युवराज सिंग यांनी डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराहने बेन स्टोक्सला बाद केलं. त्याने 54 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 79 धावांची खेळी केली.

इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोनं हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलंवहिलं शतक झळकावलं. वनडेतलं बेअरस्टोचं हे आठवं शतक आहे. इंग्लंडने 41व्या ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 253 धावांची मजल मारली आहे. मोहम्मद शमीने बेअरस्टोला बाद केलं. त्याने 10 चौकार आणि 6 षटकारांसह 111 धावांची खेळी केली.