परळी // बीड जिल्ह्याच्या अर्थिक घडी विसकटली असुन बीड जिल्ह्यात मोठा आर्थिक कणा असलेले हे केंद्र बंद असल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदरील औ.वि.केंद्रातील रोजगार थांबलेला आहे. सध्या राज्यात विजेचा तुटवडा जानवत असतांना हे वीज केंद्रे बंदच आहे.
मराठवाड्यात एकमेव असलेले परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंेद्र वेगवेगळ्या कारणामुळे मागील दोन वर्षापासुन बंद आहे. यामुळे परळीसह परळीचे औ.वि.केंद्र पुर्ण क्षमतेने कायमस्वरुपी सुरु करावे अशी मागणी परळी थर्मल पॉवर कॉन्ट्रॅक्टर्स असोिएसशनच्या वतीने करण्यात आली असुन या बाबत औ.वि.केंेद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंदारे यांना निवेदन देण्यात आले आहे.
परळीच्या औ.वि.केंद्राने महाराष्ट्राला विजेची गरज असतांना उत्पादनात अनेक विक्रम करत वेगवेगळे पुरस्कार पटकावलेले आहेत. परंतु आज हेच परळीचे औ.वि.केंद्र जवळ पास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोळसा, पाणी उपलब्ध असतांना सध्या परळीच्या औ.वि.केंद्रातुन विज निर्मिती बंद आहे. परळीच्या औ.वि.केंद्रावर हजारो कुटुंबाची उपजिविका अवलंबुन आहे. तसेच शेकडो बेरोजगारांना या थर्मल मुळे काम मिळत आहे. छोटे मोठे कंत्राटदार व सप्लायर्स त्यांच्यामुळे परळी व बीड जिल्ह्यात मोठा आर्थिक कणा असलेले हे केंद्र बंद असल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदरील औ.वि.केंद्रातील रोजगार थांबलेला आहे. यामुळे हे औ.वि.केंद्र सुरु करावे, सर्व संच एम.ओ.डी.मध्ये घेण्यासाठी उपायोजना करावी, परळीच्या वीज केंद्रास स्वस्त दरात कोळसा उपलब्ध करण्यात यावा परळीचे औ.वि.केंद्र मस्टरन मध्ये घेण्यात यावे, ना-नफा, ना-तोटा या तत्तवावर बेरोजगार, मागास भागाचा विकास, रोजगार या विषयांना महत्व देऊन या औ.वि.केंद्रातील संच सुरु करावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परळी थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने मुख्य अभियंता प्रकाश खंदारे यांना याबाबतचे शिष्टमंडळाने निवेदन दिले असुन सदरील निवेदनाच्या प्रती उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती प्रकाशगड यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अगंद हाडबे, शिवाजी बिडगर, बंडु गित्ते, महादेव मुंडे, भगवान साकसमुद्रे, शशी बिराजदार, हरिभाऊ बुरकुले, जयंतीभाई पटेल, भिकम सिंग, दशरथ जाधव, दगडु भाळे, प्रशांत क्षीरसागर, अमोल काटमोरे, राधाकिशन तोतला, तुकाराम मुंडे, बाबासाहेब गायकवाड, मुंजा गरड, धनराज कांदे, मधुकर नाईकवाडे, कृष्णा सपाटे, गोपाळ मुंडे, संजय व्हावळे, संदिपान काळे, सुनिल सानप, रमेश सरवदे, सायस मुंडे आदींची उपस्थिती होती.
Social Plugin