Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर एका टिप्परची विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने आग लागून टिप्पर जळाला



मुखेड //नांदेड बिदर या राष्ट्रीय
महामार्गावर एका टिप्परची विद्युत तारेचा
स्पर्श झाल्याने आग लागून टिप्पर जळाला
असून, तापत्या उन्हात घडलेल्या घटनेमुळे
चालक होरपळून निघाला असून,
त्याच्यावर नांदेडच्या शासकीय
रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
बुधवारच्या दिवशी सकाळी मुखेड येथून
जवळचा असलेल्या नांदेड बिदर
महार्गावर रस्त्याच्या काम सुरु असल्याने
टिप्परद्वारे मुरूम टाकण्याचे काम केले
जात आहे. या कामासाठी मुरुम घेऊन हा
टिप्पर आला असताना मुरूम खाली ।
करण्याच्या बेतात टिप्परचास्पर्श विद्दत
तारेला झाला. हा प्रकार समजताच
चालकाने टिप्पर मधून उडी घेतल्याने
चालकाचा जिव वाचला असला तरी
तळपत्या उन्हाचे चटके आणि टिप्परला
लागलेल्या आगीत चटके लागून चालक
गंभीर जखमी झाला. तात्काळ त्यास
नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले
आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती आग्निशामक दलास
मिळताच बंबाच्या मदतीने आग
विझविण्यात आली असली तरी या घटनेत
संपुर्ण टिप्पर जळून मोठे नुकसान झाले
आहे.