Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ ट्रॅक्टर व ट्रॅव्हल्सची जोरदार धडक ; दोन जागीच ठार ,एक गंभीर जखमी ...


सोलापूर // बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ खंडसरी पाटीजवळ ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर अपघात झाला. यात दोन जागीच ठार एक गंभीर जखमी झाले. २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
देगलूरकडून मुंबईकडे येडशी पांगरी मार्गे ट्रॅव्हल्स ५ मे च्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पांगरी पासून दोन किलोमीटर अंतरावर खंडसरी पाटीजवळ हा अपघात घडला.

चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर येडशीकडे जात असताना समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. त्यात ट्रॅव्हल्सचालक सागर विजयकुमार रेशमी (जिल्हा बिदर) आणि एक प्रवासी जागीच ठार झाले. ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी असल्याने सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमी असलेल्या २५ प्रवाशांवर बार्शी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.