Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सैराटची पुनरावृत्ती ! आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीसह- जावईवर रॉकेल टाकून पेटवले ; गर्भवती मुलीचा मृत्यू.. तर जावयाची मृत्यूशी झुंज



अहमदनगर  // मौजे निघोज येथे मुलीने आंदरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून तिच्या कुटुंबीयांनी विवाहित मुलगी आणि जावयाला रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली दि.०४ रोजी घडली असून, यात जखमी दोघांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरु असताना विवाहित गर्भवती मुलीचा मृत्यू झाला असून, जावई मृत्यूशी झुंज देत आहे.

मागील ६ महिन्यांपूर्वी मंगेश रणसिंह आणि रुक्मिणी या दोघांनी घरच्यांचा विरोध असताना आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे मुलीचे वडील, काका, मामांनि तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सहा महिन्यांनंतर दोघां पती-पत्नीमध्ये छोटेसे भांडण झाले त्यामुळे रुक्मिणी माहेरी निघून आली.

काही दिवसानंतर मंगेश रुक्मिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्यानंतर रुक्मिणी नवऱ्यासोबत जायला निघाली, परंत्तू रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी मुलगी रूक्मीणीस मंगेश बरोबर पाठवन्यास नकार देऊन जबर मारहाण केली होती. ता घटनेमुळे रूक्मीणीका मार्ग अनावर झाला आणि वडील, मामा, काकांचा विरोध पत्करत मंगेश बरोबर जाण्यास निघाली. याचवेळी रुक्मिणीच्या कुटुंबीयांनी दोघांना घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन घराला कूलूप लावून बाहेर निघून गेले.

दरम्यान घरातून येणाऱ्या आवाज ऐकून शेजारच्या लोकांनी दाम्पत्यास बाहेर काढले. यावेळी दोघेही भाजल्याने गंभीर जखमी झाले होते, त्यांना तात्काळ शेजारच्यांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, रुख्मिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मंगेश मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी मंगेश आणि रुक्मिणीचा जवाब घेतला असून, जबाबात दोघांनीही दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले असले तरी पोलिसांनी मुलीचे मामा घनशाम राणेंज, काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले आहे. तर मयत विवाहित रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हे फरार आहेत. या घटनेमुळे दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या मराठी सिनेमा सैराटची आठवण होऊ लागल्याची चर्चा होत आहे.