पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला लोकांनी पसंती देत एनडीएला भरभरुन मतदान केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती देण्यामागे अनेक कारणे होती. त्यातील काहींवर नजर टाकुयात...
1) सगळ्या जागांवर मोदी : देशभरात एनडीएकडून सगळ्या जागांवर मोदींसाठीच मतदान मागण्यात आले. त्यामुळे भाजपला या प्रचाराचा फायदा झाला.
2) देशभक्ती मुद्दा : विरोधी पक्षाला न जुमानता भारतीय जनता पार्टीने प्रचाराच्या शेवटपर्यंत देशभक्ती हा मुद्दा आक्रमकपणे निवडणुकीच्या अजेंड्यावर ठेवला.
3) राष्ट्रीय सुरक्षा : दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यासाठी मोदी सरकारने आक्रमक पाऊले उचलली. हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.
4) भारताला पाठिंबा : भारताने जगाच्या प्रत्येक देशापर्यंत दहशतवाद हा मुद्दा प्रभावीपणे पोहचवला. त्यामुळे जागतिक स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला.
5) हिंदूत्त्व मुद्दा : वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदीर, तसेच केदारनाथ-बद्रीनाथ येथील दौरे, गंगाघाटावर पूजापाठ, आरती यासारख्या कार्यक्रमातून हा मुद्दा दिसून आला.
6) स्वच्छता अभियान : स्वच्छता अभियान, परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या योजना नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठेचा विषय केला. यामुळे या अभियानात अनेक महत्त्वाचे नेते, अभिनेते, सामान्य माणूसही जोडला गेला.
7) आयुष्यमान भारत योजना: आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 करोडपेक्षा अधिक लोक जोडले गेले आहेत. त्यांना पाच लाखांपर्यंत विमा मिळेल. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला.
8) उज्ज्वला योजना : मोदी सरकारची ही योजना ग्रामीण महिलांसाठी लाभदायक ठरल्याचा चांगला प्रचार झाला. 'मन की बात'मधून या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतही मोदींनी चर्चा केली.
9) महागाई व भ्रष्टाचार : भाजपच्या कार्यकाळात चलनवाढ नियंत्रणाखाली असल्याचा दावा करण्यात आला. त्याचबरोबर मागील सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात वापरला गेला.
10) विरोधकांची भ्रष्ट आघाडी : एकीकडे विरोधकांची भ्रष्ट आघाडी तर दुसरीकडे एकटे नरेंद्र मोदी अशी ही लढाई असल्याचा प्रचार मोदींनी केला.
11) सुशासन : नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रशासकीय विभाग शिस्तबद्धपद्धतीने काम करायला लागली. भ्रष्टाचार कमी झाला. यासारखे मुद्दे भाजपाकडून प्रचारात वापरण्यात आले.
12) आक्रमक प्रचार : लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून देशभरात भाजपकडून जवळपास 1000हून जास्त रोड शो, सभा घेण्यात आल्या. तसेच प्रत्येक प्रचारात आक्रमक प्रचार करण्यात आला.
Social Plugin