Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सुरतमधील भीषण आगीत १५ जण ठार


सुरत // सुरतमधील सरधाना परिसरात असलेल्या तक्षशिला आर्केड या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १५ जण ठार झाल्याची घटन समोर आली आहे. दुसऱ्या मजल्यावर आग लागल्यानंतर अनेकांनी उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात ४ जणांनी आपले प्राण गमावले. तर एकूण १५ जण मृत झाल्याचे समोर आले आहे.

तक्षशीला आर्केड या इमारतीत डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टीट्यूट आहे. येथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर होते. दरम्यान दुसऱ्या मजल्यावर आज दुपारी भीषण आग लागली. या आगीनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला. आपला जीव वाचविण्यासाठी अनेकांनी उड्या मारल्या. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १८ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु केले. दरम्यान या घटनेत एकूण १५ जण ठार झाल्याचे समोर आले आहे.