परळी // येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनैश्वर जन्मोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत अखंड शिवनाम सप्ताह,श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात सोमवार (ता.२७) ते सोमवार (ता.०३) पर्यंत यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी (ता.०२) संध्याकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी हा महाप्रसाद याच शनिमंदिर मध्ये होणार आहे. त्याचबरोबर गुरुवारी (ता.३०) भव्य रक्तदान शिबीर सकाळी आठ ते बारा यावेळेत आयोजित केले आहे.अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रक्तपेढी यासाठी सहकार्य करणार आहे. रोज सकाळी शिवपाठ, परमरस्य पारायण, शनि महात्म्य पारायण, गाथा भजन, प्रवचन आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनिमंदिर जिर्णोद्धार सुरू करण्यात आला आहे.जवळपास चार कोटी रुपये खर्च करुन मंदिराची नियोजित वास्तू उभी राहत आहे.यामध्ये भाविकांसाठी भव्य असे भक्त निवास,मंदिराची वास्तू आहे. या मंदिराचे बरेचसे काम पुर्ण होत आले आहे. तरी भाविक भक्तांनी या जिर्णोद्धारास आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने करण्यात आले आहे.
Social Plugin