परळी // दुसरा श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांची रीघ लागली. 'हर हर महादेव' चा जयघोष करीत भाविकांची रविवारी रात्रीच अनेक भक्त भाविक वैद्यनाथ मंदिरात दर्शनसाठी रांगेत लागली होती. दर्शन सुलभ व्हावे यासाठी संस्थानाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरीकेटिंग लावून महिलांसाठी वेगळ्या रांगांची खास सोय करण्यात आली आहे.
यासोबतच येथे वैद्यनाथ मंदिर ट्रस्ट, लिंगायत समाज व भाविकांच्या वतीने वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा श्रावणमास तपोनुष्ठान सोहळा सुद्धा सुरु आहे. यासाठीही भाविकांचे मोठ्या प्रमाणावर शहरात आगमन होत आहे. अनुष्ठानाच्या पहिल्याच दिवशी श्रावण महिना सुरु होत असल्याने भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंदिर परिसरात 200 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांंची उपस्थिती होती
Social Plugin