परळी // सोमवारी पहाटे परळी शहरातील मोंढा परिसरात असलेल्या दुकानांना आग लागल्याने यामध्ये अंदाजीत २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परळी तील रेल्वे स्टेशन रोडवरील सरदारजी सायकल मार्ट च्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिकच्या दुकानात सकाळी ही आग लागली होती थोड्या वेळातच ही आग बाजूच्या दुकानात पसरली.
शहरात आग लागल्याचे समजताच नगरपालिकेची अग्निशमन दल दाखल झाले . आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आज सकाळी रिमझीम पावसाच्या सरी आल्या पण तोपर्यंत उशीर झाला होता.
Social Plugin