Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्री श्री रविशंकरजी यांच्या सान्निध्यात तीन दिवसीय 'आनंद उत्सव' संपन्न

**

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

'प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया स्वतः श्री श्री रविशंकरजी यांनी शिकवल्या तसेच जगणे सुसह्य होण्यासाठी "सकारात्मकतेने वर्तमानात संतुलित जगावे" असा गुरुजींनी प्रबोधनपर उपदेशदेखील केला. आपले शरीर हे आपले मंदिर असते' या तत्त्वाला अनुसरून स्वतःच्या श्वासाद्वारे स्वतःमध्ये दडलेली सुप्त ऊर्जा जागृत करता येते याची अनुभूती या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जवळपास सर्वांना आली.

१७ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या परळी वैजनाथ येथील कार्यक्रमाचे संयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग, परळी वैजनाथ परिवाराने केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक शिरीष चौधरी, रेणुका चौधरी, मुकेश भुतडा, वशिष्ठ कुकडे तसेच राहुल सामत, सिमरन सामत, गिरीधर बालदी, कैलास तांदळे, श्रद्धा साळुंके आदींनी विशेष प्रयत्न केले.
परम पूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या सान्निध्यात तीन दिवसीय 'आनंद उत्सव' संपन्न येथील नवगण महाविद्यालयात उत्साहात पार पडला. जगातील सुमारे दीडशे देशांमध्ये विविध शहरांत इंटरनेटद्वारे या उत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.