Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दरोडेखोरांच्या गोळीबारात ;सराफी दुकान मालकाचा मृत्यू



या पळापळीत दुकान साफ केले
कोपरगाव//अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावात असलेले लक्ष्मी ज्वेलर्से या सराफी दुकानावर दरोडेखोरांनी गोळीबार करुन लुटण्याचा प्रयत्न केला यामध्ये दुकान मालक शाम सुभाष घाडगे यांचा मृत्यू झाला .तर गणेश घाडगे हे जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे  सायंकाळी सात ते आठ चे सुमारास दहा ते बारा अज्ञात लोकांनी घाडगे यांच्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकाना वर लुटण्याचा उद्देशाने हल्ला केला .यावेळी अज्ञातांनी गोळीबार ही केला या गोळीबारात श्याम घाडगे यांचा मृत्यू झाला तर गणेश घाडगे जखमी झाले . गोळ्यांचा आवाज ऐकल्याने एकच खळबळ उडाली या पळापळीत संपूर्ण दुकान लुटून नेण्यात आले. घाडगे हे मूळचे संगमनेरचे आहेत.