Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाई जवळ अपघातात एक ठार


अंबाजोगाई : अंबाजोगाई - लोखंडी सावरगाव रोडवर  रविवारी रात्री ८वा भरधाव वेगातील बोलेरो गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

बालाजी दत्तात्रय रिटरकर (वय २५) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो रविवारी रात्रीच्या सुमारास स्वत:च्या दुचाकीवरून (एमएच ४४ पी ८२६३) अंबाजोगाईहून वरपगावकडे जात होता. तो लोखंडी सावरगाव रस्त्यावर आडस पाटीच्या जवळ आला असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो गाडीने (एमएच १४ बीएक्स ९२४७) त्याला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी बोलेरोच्या खाली अडकून घसरत रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात बालाजीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक सोमनाथ गिते आणि सहा. फौजदार बोडखे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.