तेली समाज दांडिया महोत्सवाचे पाचवे पुष्प उत्साहात
आपला ई पेपर/परळी वैजनाथ
“पृथ्वीवर देवीचे रूप म्हणजे स्त्री होय. स्त्रीमध्ये प्रेम, माया, करुणा आणि शक्ती यांचा सुंदर संगम असतो. त्यामुळे स्त्रीचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. तेली समाजाच्या वतीने आयोजित दांडिया महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
परळी येथे गेल्या चार वर्षांपासून तेली समाजाच्या वतीने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, यंदा या महोत्सवाचे पाचवे पुष्प मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. सोमवारी (दि. १२) आयोजित उद्घाटन समारंभाला नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तेली समाजाचे अध्यक्ष विठ्ठल आप्पा चौधरी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, सचिव प्रा. मधुकर शिंदे आणि तालुकाध्यक्ष मनोज जठार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते देवीची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर स्वागत समारंभ पार पडला. नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दांडिया महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी स्त्रीशक्तीचा गौरव करत महिलांचा सन्मान आणि सामाजिक उत्सवांमधील महिलांचा सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमास मलिकार्जुन साखरे, नागनाथ आप्पा भाग्यवंत, छगन आप्पा क्षीरसागर, अशोक बेंडे, चंद्रशेखर फुटके, ओंकार सोनटक्के, अजय सोनटक्के, शिवशंकर जठार, विनोद आळणे, शिवराज सोनटक्के, सोमनाथ क्षीरसागर, महारुद्र विटेकर यांच्यासह तेली समाज दांडिया उत्सव समितीचे अध्यक्ष तथा युवानेते पवन फुटके, सोमनाथ वाघमारे, अशोक रोकडे, राजकुमार भाग्यवंत, सचिन लासे, सतीश फुटके, राहुल क्षीरसागर, सुनील क्षीरसागर, दीपक साखरे, ईश्वर राऊत, रवी अन्नपूर्णे, शंकर कौले, ईश्वर जठार, गजानन बेंडे, प्रदीप पिंपळे, महेंद्र अन्नपुर्णे, अमोल क्षीरसागर योगेश व्यवहारे आणि प्रसाद जठार उपस्थित होते. तेली समाजाच्या या दांडिया महोत्सवामुळे समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याचा संदेश या महोत्सवातून दिला जात आहे.




0 टिप्पण्या