ग्लोबल विकास ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन एकत्रितपणे करणार काम; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कृषीकुल दौरा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्ट आणि बीड जिल्हा प्रशासन एकत्रितपणे काम करणार आहेत. कृषीकुल येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासह दुष्काळ निवारणाचा मास्टरप्लॅन आखण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांच्या दोन दिवसीय कृषीकुल दौऱ्यादरम्यान जलनायक मयंक गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी ग्लोबल विकास ट्रस्टने
दुष्काळ निवारणासाठी दहा कलमी कार्यक्रम मांडला. यामध्ये १५ हजार गरीब शेतकरी कुटुंबांना रेशन किट वाटप, अन्नछत्र, जलतारा उभारणी, गाळमुक्त धरण, नद्यांचे पुनरुज्जीवन, रिचार्ज शाफ्ट, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि चारा छावण्यांसाठी सहकार्य अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
@@@##@##@@@@@@@
परळीत डोंगरतुकाई देवी मंदिरात रांगोळीतून साकारले दुर्गामातेचे रूप!
https://aplaepaper.blogspot.com/2026/10/blog-post_13.html
मैथिली लोंढे यांचे १२ तासांचे परिश्रम; नवरात्रोत्सवानिमित्त कलासेवेतून भक्तिभावाचे दर्शन परळी वैजनाथ शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त
@@@#@@@@@@@@@##
दुष्काळात कोणतेही शेतकरी कुटुंब अन्न-पाण्याविना अडचणीत येऊ नये, या भावनेतून ग्लोबल विकास ट्रस्ट प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे मयंक गांधी यांनी सांगितले. तर दुष्काळ निवारणासाठी संस्थेच्या अनुभवाचा आणि तांत्रिक पथकाचा उपयोग करून प्रशासन समन्वयाने काम करेल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांनी स्पष्ट केले. बैठकीला जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शासनाचे नियोजन आणि सामाजिक संस्थेचा लोकसेवेचा संकल्प एकत्र आल्याने दुष्काळग्रस्त गावांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.




0 टिप्पण्या