Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात | अंबाजोगाई रस्त्यावर एसटी बस आणि दोन कारचा भीषण अपघात ; तिघे जखमी

आपला ई पेपर/केज प्रतिनिधी 

केज _अंबाजोगाई येथील पिसेगाव फाट्याजवळ ५ मार्च रोजी दुपारी दोन कार आणि एसटी बसचा भीषण तिहेरी अपघात झाला. पेट्रोल पंपाकडे वळणाऱ्या एका अज्ञात वाहनामुळे पाठीमागील स्विफ्ट आणि रिट्झ कारने आपला वेग कमी केला होता. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव अंबाजोगाई-संभाजीनगर एसटी बसने या दोन्ही कारला जोरदार धडक दिली

या भीषण अपघातात दत्ता लांडगे, विनोद जगताप आणि एसटी चालक मारुती फड हे तिन्ही चालक जखमी झाले आहेत. सुदैवाने, बसमधील १७ प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी स्विफ्ट कारचा मात्र चेंदामेंदा झाला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला एक कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळल्याची भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे...

*🔴✨ब्रेकिंग न्युज*
लेटेस्ट अपडेट*

*सावधान परळी कन्हेरवाडी-जिरेवाडी बायपास रस्ता वाहातूकीसाठी बंद*
*https://aplaepaper.blogspot.com/2026/04/blog-post.html*

🔴✨ब्रेकिंग न्युज*
लेटेस्ट अपडेट*
✨⭐
YouTube
*🔴Breaking |न्यूज |हेडलाईन*
*🔴दै.लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
✨⭐
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
*🔴संतोष बारटक्के*
*🔴9423472426*
https://aplaepaper.blogspot.com