रविवारीसुद्धा ऑनलाईन व ऑफलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारणार
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी ; एकूण 101 नामनिर्देशन पत्र दाखल
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025, दिनांक 10 ते 15 नोव्हेंबर पर्यंत एकूण 101 नामनिर्देशन पत्र दाखल
6 नगराध्यक्ष पदाकरिता
95 नगरपरिषद सदस्याकरिता अर्ज दाखल झाले आहेत.
परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्यासाठी नगर परिषदच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगर पालिकेसाठी १७ प्रभागात ३५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगर परिषद क्षेत्रातील 79,569 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरपरिषद सदस्यपदासाठी ९५ उमेदवारी अर्ज दाखल
परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी एकही अर्ज प्राप्त नाही, मंगळवार दि. ११ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी सय्यद रशिदाबी शफाकत अली यांचा अर्ज दाखल., प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सय्यद रशिदाबी शफाकत अली, प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण प्रवर्गातून बागवाले कुशक कमलबाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक 2- सर्वसाधारण प्रवर्गातून सय्यद जुबेर अली शफाकत अली, प्रभाग क्रमांक 3- सर्वसाधारण महिला प्रवर्गातून खान शाहीन नय्युम, प्रभाग क्रमांक 10-अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून पारधे दिपाली किशोर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक 6- सर्वसाधारण प्रवर्गातून लोखंडे दत्ता विष्णू, प्रभाग क्रमांक 8 - अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून कांबळे नंदिनी विश्वजीत, प्रभाग क्रमांक- 8 सर्वसाधारण प्रवर्गातून आचार्य रवि किशन, प्रभाग क्रमांक 9-सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शेख इरशाद रजियोद्दिन
आणि शेख यास्मीन बेगम शमशोद्दीन यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला असून आता पर्यंत दिनांक 13 नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद सदस्य पदाकरिता 10 अर्ज आणि नगराध्यक्ष पदाकरिता 1 असे एकूण 11 नामनिर्देशनपत्र परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणूक विभागात दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी नगराध्यक्ष पदाकरिता 3 अर्ज दाखल करण्यात आले. शेख कौसरबेगम अश्फाक, महंमद फरजाना सुलेमान, शेख नूरजहाँ बेगम मैनोद्दीन, प्रभाग क्रमांक 2- तीन नामनिर्देशनपत्र दाखल सर्वसाधारण प्रवर्गातून कुरेशी वहाब हमीद , शेख जुबेर लालामिया (यांचे कडून 2 नामनिर्देशनपत्र) , प्रभाग क्रमांक 3- पाच नामनिर्देशनपत्र दाखल शेख खैरुनिसा बेगम युसूफ
तांबोळी अजीम इसाक शेख सोहेल मुख्तार शेख हुसेनाबी अमीन
शेख आयेशा मोसीन, प्रभाग क्रमांक 6- दोन नामनिर्देशनपत्र दाखल.
सर्वसाधारण प्रवर्गातून आंधळे गोपाळकृष्ण रावसाहेब आणि पद्मराज बलभीम गुट्टे,प्रभाग क्रमांक 7-सर्वसाधारण प्रवर्गातून देशमुख मंगेश शिवाजीराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल,प्रभाग क्रमांक 9- चार नामनिर्देशनपत्र दाखल सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शेख नूरजहाबेगम मैनोद्दीन,सय्यद असिया बेगम युसूफ, शेख रेहाना बाबुमिया, नसरीन बेगम अर्शद खान प्रभाग क्रमांक 10 - दोन नामनिर्देशन पत्र दाखल अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून सुरेखाबाई पंडित झिंजुर्डे (यांचे कडून 2 नामनिर्देशनपत्र दाखल ), प्रभाग क्रमांक 15- एक नामनिर्देशन पत्र दाखल इतर मागास प्रवर्गातून मुजावर शाहेद बाबामिया यांचा उमेदवारी अर्ज दाखल, प्रभाग क्रमांक 16- तीन नामनिर्देशन पत्र दाखल सर्वसाधारण प्रवर्गातून शेख अश्फाक सज्जाद, बागवाले नितीन माणिक, पठाण इमरोज फिरोज,प्रभाग क्रमांक 17-तीन नामनिर्देशन पत्र दाखल
सर्वसाधारण महिला प्रवर्गातून- क्षीरसागर सुवर्णमाला वैजनाथराव,
सर्वसाधारण प्रवर्गातून पठाण रसूल खान अफसर खान आणि
शेख निसार नसीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025नगराध्यक्ष पदासाठी दोन नामनिर्देशन पत्र दाखल
देशमुख संध्या दिपकराव( यांचेकडून 2 अर्ज दाखल) नगरपरिषद सदस्य पदाकरिता 61 नामनिर्देशनपत्र दाखल. प्रभाग क्रमांक 1- 5 नामनिर्देशन पत्र दाखल
शेख वसीम कासिम
शेख इम्रान आजम
खान असलम अबेद( यांचेकडून 2 अर्ज दाखल)
पठाण अन्सर इस्माईल
प्रभाग क्रमांक 2 -5 नामनिर्देशन पत्र दाखल
शेख जावेद बाबू ( यांचेकडून 2 अर्ज दाखल)
शेख अनिस शेख महंमद हनीफ
शेख इलियास शकील
पठाण अरशद खान जमील खान
प्रभाग क्रमांक 3-3 नामनिर्देशन पत्र दाखल
कुरेशी मुस्तकिम रियाज कसाब
कुरेशी सुलतानाबी नजीर
शेख आयेशा मोसिन
प्रभाग क्रमांक 4-2 नामनिर्देशन पत्र दाखल
पांडे अनिता बबनराव( यांचेकडून 2 अर्ज दाखल)
प्रभाग क्रमांक 5 -1नामनिर्देशन पत्र दाखलमुलाने जुनेद मुख्तार
प्रभाग क्रमांक 6-0
प्रभाग क्रमांक 7- 2नामनिर्देशन पत्र दाखल धंपलवार वैजनाथ नागनाथ
जंगले बबन सिताराम
प्रभाग क्रमांक 8-3 नामनिर्देशन पत्र दाखल गायकवाड लक्ष्मीबाई विश्वनाथ
कच्छी माझ रफीक
कुरेशी शकील अहमद इसाक अहमद
प्रभाग क्रमांक 9-6नामनिर्देशन पत्र दाखल
साळवे गौतम सुधाकर
पठाण नसरीन बेगम अर्शद खान
शेख जरीना बेगम कासिम
शेख खतिजाबी मुसा
खान सलीमाबी आबेद
कच्छी जफियाबेगम अहमद
प्रभाग क्रमांक 10-6नामनिर्देशन पत्र दाखल
चाटे भास्कर पाटलोबा
चाटे शशिकांत भास्करराव
मुंडे महेश गोविंदराव
चाटे शोभाबाई भास्करराव (2 अर्ज दाखल) गंगणे भाग्यश्री महादेव
प्रभाग क्रमांक 11 -3नामनिर्देशन पत्र दाखल
फड प्रयाग हनुमंत
कांगणे अनुसया शामराव( 2 अर्ज दाखल)
प्रभाग क्रमांक 12 -0
प्रभाग क्रमांक 13 -2 नामनिर्देशन पत्र दाखल
बळवंत रेश्मा केशव
लाहोटी शिल्पा जयपाल
प्रभाग क्रमांक 14 -2नामनिर्देशन पत्र दाखल
शेंद्रे पूजा अभिजीत
ठाकूर सीमा किसन
प्रभाग क्रमांक 15-11नामनिर्देशन पत्र दाखल
मोहेकर गोविंद रामकिशन
मौजन तबस्सुम जमील (2 अर्ज दाखल)
मुजावर शाहेद बाबामिया (2 अर्ज दाखल)
शेख शारेक शफीक( 2 अर्ज दाखल)
शेख आसिया अन्वर(2 अर्ज दाखल)
शेख खाजाबी इस्माईल
शेख असमत शाकेर
प्रभाग क्रमांक 16-6नामनिर्देशन पत्र दाखल
कुरेशी आरेफा बेगम मेहबूब पाशा
मुलानी जुनेद मुख्तार (2 अर्ज दाखल)
शेख समद सादेक
पठाण इमरोज फिरोज
सय्यद अब्दुल जबी उल्लाह अब्दुल मुक्तदीर
प्रभाग क्रमांक 17-4नामनिर्देशन पत्र दाखलगडेकर वंदना शाम ( 2 अर्ज दाखल)गडेकर शाम रामभाऊ
शेख फयाजोद्दीन शरफोद्दीन यांनी अर्ज दाखल केला आहे.
अर्ज सादर करण्यासाठी उरले अवघे १ दिवस
सोमवार, १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली आहे. तर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे. तसेच त्याच दिवशी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हे अर्ज स्विकारले जाणार आहेत. रविवारच्या दिवशी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.त्यामुळे उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आता अवघे १ दिवस उरले आहेत.
छाननी आणि अर्ज मागे घेणे
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच २१ नोव्हेंबर पर्यंत ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
नगरपरिषद निवडणुकांसाठी रविवारीसुद्धा ऑफलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारणार
नगरपरिषदा निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन; तसेच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा उद्यादेखील (रविवारी, ता. १६) स्वीकारली जातील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. १६) देखील सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.

Social Plugin