अंबाजोगाई पोलिस दलातील माजी पोलीस निरीक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय 57) यांनी अंबाजोगाई येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी संध्याकाळी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
सुनील नागरगोजे हे मूळ परळी तालुक्यातील नागदरा येथील होत. अनेक वर्षांच्या सेवेनंतर मागील काही महिन्यांपूर्वी ते नोकरीतून बाहेर पडले होते. नुकतेच त्यांनी अंबाजोगाई येथील घर बांधकामासाठी पडल्याने ते प्रशांत नगर येथे किरायाने राहत होते. त्या ठिकाणीच त्यांनी सोमवारी रात्री घरात कोणी नसताना सिलिंग गळफास घेतल्याची घटना निदर्शनास आली आहे. घटनास्थळी पोलीस दल पोहोचले असून अधिक तपास करत आहेत.
Social Plugin