आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक पुण्यभूमी असून येथे येणारा प्रवासी सहकुटुंब प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी येतो. रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्या रेल्वे प्रवाशांच्या जीव धोक्यात आला आहे.. तब्बल तीन महिन्याचे रेकॉर्ड पाहता रेल्वे परिसरात विविध घटनांनी रेल्वे प्रवासी त्रस्त झाले आहेत. काही घटनांची दखल ही बेदखल आहे. परळी रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे प्रवाशाची सुरक्षा धोक्यात येण्याची मूळ कारण म्हणजे येथील प्रशासन आहे. या परिसरात गुंडागर्दी चोरी लूट मार या घटनांची सतत पुनरावृत्ती होत आहे. तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष का ?असा सवाल माणिक नगर गणेश मंडळ यांनी आज परळी पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केला आहे.तसेच या परिसरात अपंग तसेच गोरगरीब भिक मागणीच्या उद्देशाने परिसर बनला गुन्हेगारीचा अड्डा.. नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणात परळीतील अनेक नागरिकांनी परळी बंदचे आवाहन केले आहे
माणुसकीला काळीमा फासणारी घटना दि. 31 रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकात थांबलेल्या एका पाच वर्षीय बालिकेला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे तातडीने घटनास्थळी पोहोचले अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले आहे.
याबाबत प्राप्त प्राथमिक माहिती अशी की, पंढरपूर येथील एक जोडपे आपल्या लहानग्या पाच वर्षीय मुलीला घेऊन कामाच्या शोधात परळीला रेल्वेने आले होते. ते रेल्वेस्थानकावर आले. या ठिकाणी हे पती-पत्नी आपल्या मुलीसह उतरले. यातील पीडित बालिकेची आई दोन-तीन दिवसापासून आजारी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच थोडा वेळ आराम करून आपण बाहेर जाऊ असा विचार करून ती आपल्या मुलीला कुशीत घेऊन त्याच ठिकाणी झोपली. पिडित मुलीचे वडील स्थानकातच थोडेसे बाजूला गेलेले होते.दरम्यान तेवढ्या काही वेळात या मुलीच्या आईला झोप लागली व मुलगी तिच्या अवतीभवतीच चकरा मारत होती. याच दरम्यान एकटी मुलगी बघून अज्ञात हैवानी वृत्तीच्या व्यक्तीने तिला त्या ठिकाणाहून नेले व गैरकृत्य केले.
पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून हा अज्ञात हैवान तिथून पसार झाला. ही मुलगी रडत तिच्या आईकडे आल्यानंतर तिच्या आईने काय झाले याचा शोध घेतला असता तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव बघून तिच्यावर गैरप्रकार झाल्याचे तिच्या लक्षात आले. या पीडित बालिकेला परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
या बालिकेवर रेल्वे स्थानकातील दादऱ्याखाली नेउन कुणीतरी अज्ञात हैवान वृत्तीच्या व्यक्तीने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.प्राथमिक वैद्यकीय तपासणीत गैरकृत्य झाल्याचे आढळले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान परळी रेल्वे स्थानक परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे.
Social Plugin