आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी
काल रात्रीपासून परळी तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत प्रशासनाने वेळोवेळी त्या त्या भागात अलर्ट राहण्याच्या आदेश दिले आहेत.
कौडगाव हुडा ता परळी वै येथील नदीमधे एक चारचाकी गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली.गाडीतील चार व्यक्तीपैकी दोन व्यक्ती झाडावर बसले आहेत.एसडीओ साहेब,डीवायएसपी साहेब,तहसीलदार साहेब व एपीआय साहेब घटनास्थळी हजर आहेत. पाण्याचा प्रवाह जोरात आहे.पाऊस चालू आहे.आपदग्रस्त व्यक्तीना प्रशासनाच्या व गावक-याच्या वतीने बाहेर काढणेचे प्रयत्न चालू आहेत. राहूल पौळ रा डिग्रस,राहूल नवले रा. पुणे
अमर पौळ नावाचा तरुण पाण्याच्या बाहेर सुखरुप काढले असून दुस-या दोन तरुणाला बाहेर काढ्यात यश आले आहे.
4 पैकी अद्याप एक जनाचा अजून पर्यंत शोध सुरू आहे.
इतर तरुणांना बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण होते, प्रशासन अलर्ट आहे प्रयत्न करीत आहेत परंतु बाहेर काढणे शक्य नाही त्यामुळे आत्ताच जिल्हाधिकारी साहेब यांना SDRF ची टीम किंवा हेलिकॉप्टरची व्यवस्था करणे बाबत बोलणे झाले आहे..!
परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथे नदीचे पुरात बेपत्ता विशाल बल्लाळ या युवकाचा परळी नगरपरिषद अग्निशमन दल टीम व भोई समाजाचे पोहणारे पथक यांच्यामार्फत सोमवार सकाळपासून शोध घेत आहेत. यावेळी परळीचे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे , ग्रामस्थ ,सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी आहेत.
सदर ठिकाणी राजाभाऊ पौळ व दिग्रसचे सरपंच सुभाष नाटकर व या भागातील प्रमुख कार्यकर्ते,घटनास्थळी उपस्थित आहेत व माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचे सहकार्य रात्री बारापासून सुरू आहे आमदार धनंजय मुंडे बचाव कार्यात संपर्क कार्यालय याबाबत सतर्क असून प्रशासनाशी संपर्कात आहे .
Social Plugin