आपला ई पेपर online परळी /प्रतिनिधी
येथील माऊंट लिटरा झी स्कूलमध्ये भारत सरकार आयोजित "हर घर तिरंगा" या अभियानाद्वारे तीन दिवसीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगदी आनंद आणि हर्षोल्लसात साजरा केला गेला.
याप्रसंगी दि.13 /08/2025 रोजी शाळेची प्राचार्य मंगेश काशीद सर तर दि. 14/8/ 2025 रोजी शाळेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध डॉक्टर हरिश्चंद्र वंगे दादा यांच्या हस्ते तर दि.15 ऑगस्ट 2025 रोजी परळी शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रामेश्वर बांगड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रमाने संपूर्ण दिवस माऊंट लिटरा शाळेसाठी ऐतिहासिक क्षण ठरला. माऊंट लिटरा झी स्कूलचा पहिला स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अतिशय उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी लवकरच शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत देशभक्ती गीतांच्या मधून संगीताने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्याचा आनंद झळकत होता.
प्रमुख पाहुणे डॉ. रामेश्वर बांगड यांनी ध्वजवंदन करून विद्यार्थ्यांना देशसेवेचे व समाजासाठी काहीतरी करण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. दुसरे प्रमुख पाहुणे श्रीराम मुंडे यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेला आवश्यकतेनुसार मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उपस्थित व्यक्तिमत्व विलास मुंडे व सुरेश घुगे सर यांनी सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ आणि स्वातंत्र्य म्हणजे काय याविषयी मार्गदर्शन केले
या विविध कार्यक्रममध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेली भाषणे, देशभक्तीपर गीते, कविता आणि नृत्याविष्कार पाहून उपस्थित पालक व मान्यवरांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या "वंदे मातरम" च्या घोषणेमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उर्जेने भारावून गेला होता.
या वेळी माऊंट लिटरा झी स्कूलचे प्राचार्य मंगेश काशीद सर यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन केले. शाळेचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा यांनी पालकांना उद्देशून "लवकरच शाळेत गुरुकुल पद्धतीचे शिक्षण सुरू होईल" अशी ग्वाही दिली. त्यांच्या या शब्दांनी पालकांच्या मनात नवा विश्वास व आशा निर्माण झाल्या आहेत.
आजचा हा पहिला स्वातंत्र्यदिन सोहळा विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळे आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे अविस्मरणीय ठरला. देशभक्तीचा उत्साह, एकतेचा संदेश आणि उज्ज्वल भविष्यासाठीची प्रेरणा प्रत्येकाच्या मनात घेऊन हा सोहळा दरवर्षी याच उत्साहाने साजरा करण्याची आश्वासन शाळेचे उपाध्यक्ष प्राध्यापक कैलास घुगे सर यांनी यावेळी दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी खूप परिश्रम घेतले

Social Plugin