आपला ई पेपर/online/परळी प्रतिनिधी
येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल म्हणजे परळी शहराची लाईफ लाईन आहे. या उड्डाणपुलाचे काम म्हणजे सो चुहे खाके बिल्ली चली..अशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. खात्यातील या अगोदर केलेल्या डागडोजी कामाची चौकशी केली जावी.
कारण या मुख्य उड्डाणपुल रस्त्याला जोडून पाच शाळा भेल स्कूल, विद्या वर्धनी विद्यालय, पोद्दार स्कूल, थर्मल पॉवर स्टेशन कर्मचारी तथा रोजंदारीवर काम करणारे हजारो मजदूर कुटुंब याच रस्त्यावरून ये जा करतात त्यांना दैनंदिन जीवनात अशा अडथळ्यांना तोंड देवून आणि पावसाळ्यामध्ये परिस्थितीमध्ये न परवडणारे आहे. कुठलेही पूर्व सूचना न देता अचानकपणे असे पत्र काढून नागरिकांना वेठीस धरणे अन्यायकारक आहे त्यामुळे शहरातील सामाजिक संघटनाने याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे.
पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे पर्याय म्हणून अगोदर रस्ता तयार करावा. ही बाब चांगली आहे परंतु परिसरातील नागरिकांना शहरात ये जा करण्यासाठी प्रचंड ताण येणार आहे.
परंतु प्रशासनाने पुला खालून नागरिकांना पायी ये जा व मोटरसायकल,ऑटो येणाऱ्या जाणाऱ्याना पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे अशी मागणी परळीच्या अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
दिनांक 26 मे पासून पुढे एक महिना म्हणजेच 30 जून पर्यंत या उड्डाण पुलाच्या कामकाज होणार आहे त्यामुळे उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबतच्या निर्णयात अंशतः बदल करण्यात आला असला तरी सर्व सामान्य नागरिकांना याचा प्रचंड ताण येणार आहे.
शहरात येणाऱ्या व शहरातील नागरिकांना शिवाजी नगर,थर्मल, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या नागरिकांना पर्याय म्हणून उड्डाण पुला खालुनच ये जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन देण्यात यावी.
Social Plugin