परळी /प्रतिनिधी
बीड येथे नुकत्याच झालेल्या टीओटी सीबीसीई रिसोर्स पर्सन म्हणून राजस्थानी पोदार लर्न स्कूल चे संगणक विभाग प्रमुख सिताराम देविदास कराड यांची नुकतीच बोर्डाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सीबीएसई रिसोर्स पर्सन (CBSE RESOURCE PERSON)म्हणून निवड केली आहे.त्यांच्या या कौतुकास्पद यशाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
परळी तालुक्यातील फक्त दोन शिक्षकांची निवड झाली आहे त्यापैकी राजस्थानी पोदार लर्न स्कूल हे शिक्षक सिताराम कराड हे आहेत.
शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे प्राचार्य बी.पी सिंग यांनीही त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Social Plugin