Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी महिलांच्या गर्दीने बाजार फुलून गेला


आपला ई पेपर परळी वैजनाथ/ संतोष जुजगर

नवीन वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकरसंक्रांतीसाठी तिळगुळ, हळदी-कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी परळी शहरातील  बाजारपेठेत महिलांची गर्दी वाढली आहे. त्यातच,  आज आज शनिवार व उद्या रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने महिलांची खरेदीसाठी अधिक गर्दी होईल, अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.


तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकरसंक्रांत. भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा असलेला

मकरसंक्रांतीचा सण येत्या मंगळवारी आहे. या दिवशी 'तीळगूळ द्या, गोड बोला...' असा संदेश देत प्रेम, आपलुकी शिवाय एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा रुढ आहे. मकरसंक्रांती निमित्ताने बाजारात सुगडी त्याचबरोबर विविध प्रकारचे वाण, तिळगुळ, बांगड्या बाजारामध्ये विक्रीला आल्या आहेत. यांसह रेडिमेड तीळगूळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, साखर तसेच गुळाची रेवडी, हलवा खरेदी जोमात सुरु झाली आहे.  तीळ 160 रुपये किलो आणि गुळ 60 ते 70 रुपये किलो असा दर असल्याचे शिवम सुपर शॉपी चे संचालक शिवम वैजनाथआप्पा कोल्हे यांनी दिली तर  हळदी 100 रुपये किलो व कुंकू 140 रुपये किलो दराने विक्री केले जात असल्याचे राहुल मसाला अँड रांगोळी दुकानाचे संचालक सचिन पाचणकर यांनी सांगितले. दरम्यान, हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी विविध आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी  शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.